Helpline : 8888122228 India's First Buddhist Minority Institution - BIS E-mail : infobiscbse@gmail.com
आपला पाठींबा - आपलं मत
भारतीय घटनेच्या आर्टिकल ३०(१) च्या मुलभूत अधिकार अंतर्गत भारतातील पहिली बुद्धिस्ट मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन
बहुजन समाजातील मुलांसाठी CBSE चे शिक्षण मोफत करण्यासाठी तसेच बहुजन समाजातील डि. एड./बी.एड. धारकांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी तसेच भारतीय राज्य घटनेतील आर्टिकल ३०(२) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कुल औरंगाबाद मार्फत बहुजन समाजातील प्रचलित लोक नेते यांच्या मार्फत शासना कडे पाठपुरावा करणे चालू आहे त्यासाठी प्रत्येक आंबेडकरवादी अनुयायांचा पाठींबा असणे गरजेचे आहे ... आपला पाठींबा आमच्या अधिकृत वेबसाइट वर नोंदवा- आपले मत हो किंवा नाही मध्ये नोंदवा
बाबासाहेबांचा संदेश - 'शिक्षण' हा सामाजिक, आर्थिक, राजकीय क्रांतीचा मूलाधार आहे.

Your Opinion - आपले मत

आपले नाव
Your Name *:
  
आपला मोबाईल नंबर
Mobile Number :*
  
आपले मत
Opinion :*
   आपले मत हो किंवा नाही मध्ये नोंदवा

x

Fundamental Rights - मुलभूत अधिकार


1] मागील १० वर्षांपासून BIS संघर्ष करत आहे.
2] BIS च्या माध्यमातून भारतीय राज्य घटना कलम ३०(१) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.
3] शासन आणि प्रशासन भारतीय राज्य घटना कलम ३०(२) नुसार उदासीनता दाखवत आहे.
4] दरवर्षी ४५० कोटीचे बजेट अल्पसंख्यांक वर्गाच्या विकासासाठी वापरले जाते
5] मा. उच्चं न्यायालय यांच्याकडून शासनाला भारतीय राज्य घटनेच्या आर्टिकल ३० प्रमाणे अंमलबजावणी करण्यास सांगितले
6] मा. ना. शिक्षण विभाग मंत्री आणि अल्पसंख्यांक विभाग मंत्री आयु. विनोद तावडे सर यांनी १५/१२/२०१६ रोजी BIS ला संयुक्त बैठकीचे आश्वासन दिले, ते आजपर्यन्त पूर्ण केले नाही

x

WHY BIS - BIS का आणि कशासाठी


BIS President : Adv.P.R.Dhale (Bouddha)
L.L.M. (Ex. Judge)
बहुजन समाज्याच्या मुलभूत गरजा किंवा प्राथमिक गरजा कोणत्या असतील तर त्या शिक्षण, रोजगार, आरोग्य आहे आणि या तिन्ही गरजा माणसाच्या अन्न वस्त्र , निवारा या मुलभूत गरजांशी संबधित आहे.
बाबासाहेबांच्या संदेशाप्रमाणे शिक्षण हा सामाजिक, आर्थिक, राजकीय क्रांतीचा मूलाधार आहे.
या संदेशाप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष आयु. पी. आर. बौद्ध (ढाले) सर यांनी २००६ साली न्यायाधिश पदाचा राजीनामा देऊन २००७ साली पंचशील बहुउद्धेशीय सेवाभावी संस्था या संस्थेची स्थापना केली.दि ९/१०/२००८ रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे धम्मदीक्षा घेतली. २९/१०/२००८ ला श्रामणेर झाले आणि या कार्याला मूर्त स्वरूपात दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल ८४ मुलांसहित २००९ पासून सुरु करून चालू केले.आज रोजी महाराष्ट्रात ३० जिल्हां मध्ये १५० सेंटर्स मधून जवळपास १०,००० विदयार्थी, १५०० पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी, १०,००० पालक वर्ग BIS सोबत काम करत आहे. BIS ला महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यामध्ये BIS सेंटर उभा करणे आहे.म्हणजेच ४५० सेंटर्स महाराष्ट्रात उभे करणे आहे.

संस्था स्थापण्यामागील उद्देश
फक्त शैक्षणिक संस्थांमधूनच मानव संसाधन बानू शकते. इतर अल्पसंख्याकांनी ते साध्य केले. परंतु आपण खूप मागे पडलो. बाबासाहेबांनी आपणास बुद्ध धम्म बाटवु नका म्हणून बजावून सांगितले . ते विसरायला लागलो आणि आपल्या वैऱ्यांच्या पंगतीत जाऊन बसायला लागलो. हे सर्व टाळण्यासाठी सदरील संस्था स्थापलेली आहे. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दूरदृष्टीने भारतीय घटनेमध्ये आर्टिकल ३०(१) समाविष्ट केलेले आहे. ज्याद्धारे प्रत्येक अल्पसंख्याकाला मूलभूत अधिकार दिलेला आहे कि, त्याने स्वतःच्या धम्माच्या विकास करण्यासाठी शैक्षणिक संस्थांची निर्मिती करून अल्पसंख्याक मॅनॅजमेन्ट खाली चालवू शकतो. हा मुलभुत अधिकार आहे. म्हणजे सरकारही यावर मर्यादा आणू शकत नाही. जर बाधा आली तर उच्च न्यायालयामध्ये त्याची दाद मागता येते. बाबासाहेबांची दूरदृष्टी होती कि, बुद्ध धम्म स्वीकारल्यानंतर अल्पसंख्याक म्हणून कुचंबणा होऊ नये तर विकास करून घेता यावा. परंतु शोकांतिका हि आहे कि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कुल पूर्वी बुद्धिस्ट अल्पसंख्याकांच्या विकासासाठी एकही संस्था स्थापन केली नाही. कोणत्याही समाजाचा विकास फक्त शैक्षणिक संस्थांद्धारेच होतो. सन १९५० पासून घटना अंमलात आल्यापासून २००९ प्रयन्त ५९ वर्ष बुद्धिस्ट अल्पसंख्याकांच्या विकासासाठी एकही संस्था कार्यरत झाली नाही तर विकास कसा साधला जाणार. हि भयंकर पोकळी भरून काढण्यासाठी सदरील संस्थेची निर्मिती करण्यात आलेली आहे.

नर्सरी ते १० वि निवासी शाळा
बाबासाहेब डॉ. बी.आर. आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा बौद्धमय भारत बनविण्यासाठी खरे अनुयायी निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी संस्थेने महाराष्ट्रभर ४५० शाखा दोन एकर जागेवर उभा करण्याचा संकल्प घेऊन कार्य करणे सुरु केले आहे. सदरील शाखा बौद्ध धम्मीयांचें तालुका ठिकाणावरील प्रमुख केंद्र बनणार आहे. अनेक रोजगार निर्माण होणार आहेत. बौद्ध धम्माला नवीन लकाकी प्राप्त होणार आहे.
कारण बाबासाहेब म्हणतात :- केवळ स्वतः आदर्श बौद्ध बनून कर्तव्यच्युत राहणे हे खऱ्या बौद्धांचे लक्षण नव्हे. बौद्ध धम्म प्रसारासाठी अहोरात्र झटणे हे खऱ्या व आदर्श बौद्धांचे कर्तव्य होय. बौद्ध धम्माच्या प्रसार व प्रचार करणे म्हणजेच मानव जातीची सेवा करणे होय.(डॉ बाबासाहेब आंबेडकर, लेखन आणि भाषणे, खंड - २०, पण क्र. ३८७)

x

Leader - आपले लोकनेते

माजी खासदार मा.आयु.बाळासाहेब आंबेडकर सर यांच्या सोबत चर्चा करताना BIS चे अध्यक्ष आयु. पी.आर. ढाले (बौद्ध) आणि BIS चे सोबत चे पदाधिकारी
केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय विभाग ना. आयु. रामदास आठवले सर यांच्या सोबत चर्चा करताना BIS चे अध्यक्ष आयु. पी.आर. ढाले (बौद्ध) आणि BIS चे सोबत चे पदाधिकारी
मा. आमदार आयु. जोगेन्द्र कवाडे सर यांच्या सोबत चर्चा करताना BIS चे अध्यक्ष आयु. पी.आर. ढाले (बौद्ध) आणि BIS चे सोबत चे पदाधिकारी
मा. आयु. सुरेश माने सर अध्यक्ष BRSP यांच्या सोबत चर्चा करताना BIS चे अध्यक्ष आयु. पी.आर. ढाले (बौद्ध) आणि BIS चे सोबत चे पदाधिकारी

x

BIS Movement - BIS चा संघर्ष

Icon Of Education Maharashtra